जालन्याच्या विकासात ‘स्टील’चा सिंहाचा वाटा- राजेंद्र दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:22 AM2018-08-24T01:22:42+5:302018-08-24T01:23:06+5:30
औरंगाबादमधून विभागणी होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु, जालनेकर व स्टील उद्योजकांनी एकजूट, जिद्द, परिश्रम आणि काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशात जालन्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण करून दिली. शिवाय, विदेशातही जालना जिल्हा ओळखला जाऊ लागला आहे. जालना जिल्ह्याच्या एकूणच प्रगतीत स्टील उद्योजकांसह अन्य उद्योजगांचाही सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार ‘लोकमत’ चे एडीटर ईन चिफ राजेंद्र दर्डा यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : औरंगाबादमधून विभागणी होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु, जालनेकर व स्टील उद्योजकांनी एकजूट, जिद्द, परिश्रम आणि काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशात जालन्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण करून दिली. शिवाय, विदेशातही जालना जिल्हा ओळखला जाऊ लागला आहे. जालना जिल्ह्याच्या एकूणच प्रगतीत स्टील उद्योजकांसह अन्य उद्योजगांचाही सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार ‘लोकमत’ चे एडीटर ईन चिफ राजेंद्र दर्डा यांनी काढले.
जालना येथे ‘लोकमत’च्यावतीने स्टील उद्योगाच्या सुवर्ण महोत्सवाच्या वाटचालीला अनुषंगाने विशेष पुरवणीचे विमोचन व स्टील उद्योग उभारून जालन्याची ओळख निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान सोहळा गुरूवारी सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेंद्र दर्डा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, स्टील रिरोलींग असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश मानधनी, संपादक सुधीर महाजन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, लोकमतचे वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालन्याच्या उद्यमशीलतेला नमन करून राजेंद्र दर्डा यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. ‘जालना सोन्याचा पालना’ हे वाक्य माझ्या दृष्टीने बरोबरच आहे. येथील लोक मजबूत आहेत. त्यांच्यात जिद्द आहे. कधीकाळी जालना जिल्हा अनाजमंडीसाठी प्रसिध्द होता. परंतू, आता जालन्याने स्टील उद्योगात आपली ओळख निर्माण केली आहे. ‘कब करवट बदलकर, कब स्टील सिटी बन गया...’ हे समजलेच नाही, असे सांगत त्यांनी स्टील उद्योजकांचे कौतुक केले. यावेळी उद्योजकांनीही पाठीवर मिळालेल्या कौतुकाच्या थापेचा टाळ्या वाजवून स्वीकार केला.
येथील तरूण उद्योजकांमध्ये एक वेगळीच धमक आहे. तंत्रशुद्ध व अत्याधुनिक यंत्राचा वापर करून त्यांनी स्टील जगतात आपले नाव कोरले. कधी काळी सीड इंडस्ट्री म्हणूनही जालन्याची ओळख होती. ती तर कायम ठेवलीच, पण आणखी डाळ, चिवडा, खाद्य तेल, चहा, पेढा यांचाही ‘ब्रँड’ निर्माण केला आहे, ही खरोखरच अभिमानाची बाब असल्याचे दर्डा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा अध्यापक, प्रास्ताविक कुमार देशपांडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ‘लोकमत’ जालना आवृत्तीचे जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख यांनी मानले. यावेळी लोकमत जालना आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर यांचीही उपस्थिती होती.
राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
लोकमत’ला जालन्याने ‘सपोर्ट’ केला
औरंगाबाद विभागात १९८२ साली ‘लोकमत’ची सुरूवात झाली. ‘लोकमत’ सुरू करताना जालन्याने खूप ‘सपोर्ट’ केला. ‘लोकम’च्या यशात जालन्याचेही खूप मोठे योगदान आहे असे म्हणत राजेंद्र दर्डा यांनी जालनेकरांचे आभार व्यक्त केले.
जालन्याच्या मार्केटमध्ये खूप शक्ती
जालन्याचे उद्योजक परिश्रम करून यश मिळविणारे आहेत. त्यामुळे येथील मार्केटमध्ये एक वेगळीच शक्ती आहे. औरंगाबादपेक्षा जालन्याचे मार्केट दर्जेदार आहे.
एकमेकांबद्दल प्रेम अन आदर
आपल्या बाजूचा माणूस मोठा होत असेल तर त्याला खाली ओढण्याची प्रवृत्ती अनेक ठिकाणी पहायला मिळते. परंतू, जालन्यात तसे नाही. येथील उद्योजकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम अन् आदर नेहमीच पाहायला मिळतो. त्यांच्या या एकजुटीमुळे जालन्याने देशाच्या नकाशावर आपले नाव कोरले आहे.
दहा वर्षांत औरंगाबाद-जालना होणार जुळे शहर
मी यापूर्वीही खात्री दिली होती आणि यापुढेही देतो की, पुढील दहा वर्षांत जालना व औरंगाबाद ही दोन्हीही शहरे उद्योगांमुळे जोडली जातील. तशी वाटचालही सुरू आहे.
तू भी अच्छा मैं भी अच्छा...
जालना उद्योगशीलतेमुळे व आपल्या स्वबळावर वाढत आहे. येथील उद्योजक एकमेकांशी जुळवून घेतात. तू भी अच्छा मै भी अच्छा... असे असल्यामुळे जालना जिल्ह्याचा विकास होत आहे.
मुंबईला मोठा सोहळा घेणार
जालन्यात आजचा पार पडलेला सोहळा खरोखर अभिनंदनास पात्र आहे. असाच कार्यक्रम आपण राज्य पातळीवर घेऊ. राज्यातील सर्वाेत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी लवकरच मुंबईत एक कार्यक्रम घेतला जाईल, असेही राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
तसेच यासाठी स्टील असोसिएशनलाही सोबत घेतले जाईल, असेही दर्डा म्हणाले.
यांचा झाला सन्मान
१. एसआरजे स्टीलचे सुरेंद्र पित्ती, जितेंद्र पित्ती, राजेंद्र पित्ती
२. राजुरी स्टीलचे व्यवस्थापकिय संचालक दिनेश राठी, संचालक डी.बी.सोनी, शिवरतन मुंदडा, आशिष भाला
३. स्टील रिरोलींग असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश मानधनी
४. ऋषी स्टीलचे संस्थापक महाविर अग्रवाल, पंकज अग्रवाल
५. कालिका स्टीलचे संचालक अनिल गोयल यांचे वडील नंदकिशोर गोयल तसेच संचालक घनश्याम गोयल, अरूण अग्रवाल
६. भाग्यलक्ष्मी स्टीलचे संचालक नितीन काबरा
७. गजलक्ष्मी स्टीलचे संचालक अनुप जाजू
८. रूपम स्टीलचे संचालक किशोर अग्रवाल, राजेश अग्रवाल
या मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती
राजुरी स्टीलचे दिनेश राठी, डी. बी. सोनी, साहित्यिक रेखा बैजल, शिवकुमार बैजल, जिल्हा दूरसंचार व्यवस्थापक सय्यद, अॅड.सतीश तवरावाला, भाग्यलक्ष्मी स्टीलचे सतीश अग्रवाल, सुनील गोयल, नितीन काबरा, कालिका स्टीलचे अनिल गोयल, अरूण अग्रवाल, महोदया सीडस्चे केदार मुंदडा, गजलक्ष्मी स्टीलचे अनुप जाजू, भाईश्री ग्रुपचे भावेश पटेल, कलश सीडस्चे समीर अग्रवाल, महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनीचे रितेश मिश्रा, शक्ती इंजिनिअरिंगचे अरूण गेही, परिवर्तन अॅग्रो अॅन्ड रिअल इस्टेटचे डॉ.विठ्ठल पवार, डॉ.लोखंडे, लक्ष्मी कॉटस्पीनचे संजय राठी, सतीश पंच, कोठारी उद्योगचे विनयकुमार कोठारी, व्यापारी महासंघाचे, हस्तिमल बंब, जगदीश राठी, आशिष भाला, अॅड.सतीष तवरावाला, शिवरतन मुंदडा, इम्पॅक्ट अॅड एजन्सीचे हेमंत ठक्कर, पिंपरीये अॅड एजन्सीचे विक्रम पिंपरीये, वायुदूत अॅड एजन्सीचे एजन्सीचे विजय मोटवानी, इश्वरी अॅड एजन्सीचे सिध्देश्वर केसकर, आदित्य अॅड एजन्सीचे संदीप जावळे, परिवार सुपर मार्केटचे साबेर कच्छी, क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे कांतीलाल राठी, रेमण्ड शॉपचे सुदेश सकलेचा, साक्षी फायनान्सचे राजेश खिस्ते, दीपक हॉस्पिटलचे डॉ. संजय राख, अभय कुलकर्णी, डॉ. गिरीश पाकणीकर, शिंदे हेअरींगचे संचालक पवन शिंदे, हॉटेल विजयचे संचालक अभय करवा, हॉटेल विजय विलासचे संचालक विनीत सहानी, भारत ज्वेलर्सचे संचालक भरत गादिया, एस.जे.ज्वेलर्सचे संचालक विनोद गिंदोडिया, मधुर केटर्सच्या संचालक सोनाली जयपुरिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जीएसटीचे सहाआयुक्त सोळंके, पंकज लड्डा, अनया अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
स्टील उद्योग करतो विजेची बचत
४स्टील उद्योगात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करुन मोठ्या प्रमाणात विजेची बचत करत वर्षाला २५ लाख टन स्टील उत्पादन येथील स्टील इंडस्ट्री करत आहे. यामुळे एक वेगळा ठसा जगात उमटविला आहे. याची लोकमतने दखल घेत स्टील उद्योजकांचा सन्मान केला, हे आमचा उत्साह वाढविणारे आहे. देश विदेशात प्रसिध्द असलेल्या टाटा स्टीलच्या आधी येथील उद्योजकांनी आपल्या सळईवर कंपनीचे नाव लिहण्याची प्रथा येथील स्टील उद्योगाने देशाला दिली आहे. विशेष म्हणजे २०१२ मध्ये आलेल्या जागतिक मंदीतही आपल्या ब्रॅन्डमुळे खंबीरपणे उभे राहिले आहेत. उद्योगनगरीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या उपलब्धीवर लोकमतने यावर एक विशेष पुरवणी काढून सन्मान करणे आमच्यासाठी मानाचा तुराच आहे. तसेच राजेंद्र दर्डा उद्योगमंत्री असताना येथील स्टील उद्योगाला १०० मेगावॅटवरुन २०० मेगावॅट वीज पुरवठा करण्यास सुरवात झाली. यामुळे स्टील व्यवसायाला अल्पावधीतच मोठी भरारी घेता आली. मुबलक प्रमाणात वीज मिळाल्यानेच देशाची वाढती स्टीलची मागणी पूर्ण करता आली. हे राजेंद्र दर्डा यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले.
- डी.बी.सोनी, संचालक, राजुरी स्टील