मुंबईत चोरलेले वाहन जालना शहरात सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:22 PM2020-02-25T23:22:01+5:302020-02-25T23:22:21+5:30

मुंबई येथे चोरलेल्या हायवा वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री करण्याचा चोरट्याचा प्रयत्न कदीम पोलिसांनी उधळून लावला.

The stolen vehicle was found in Jalna | मुंबईत चोरलेले वाहन जालना शहरात सापडले

मुंबईत चोरलेले वाहन जालना शहरात सापडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई येथे चोरलेल्या हायवा वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री करण्याचा चोरट्याचा प्रयत्न कदीम पोलिसांनी उधळून लावला. मुंबईतून वाहन चोरणाऱ्या चोरट्यासह वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी शहरातील दु:खीनगर भागात करण्यात आली.
कदीम पोलीस ठाण्याचे पोनि देविदास शेळके व त्यांचे सहकारी २३ फेब्रुवारी रोजी गस्तीवर होते. शहरातील दु:खीनगर भागातील शेतात एक व्यक्ती वाहनाचे पार्ट तोडत असल्याची माहिती पोनि शेळके यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने कारवाई करून शफिक पठाण मनसूर पठाण (रा. संजय नगर, जुना जालना) याला ताब्यात घेतले. त्याने पंधरा दिवसांपूर्वी ते वाहन मुंबई येथून चोरून आणल्याचे सांगितले. पठाणसह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि देविदास शेळके, पोना कृष्णा चव्हाण, गणेश जाधव, कर्मचारी रमेश काळे, आशा मगरे यांच्या पथकाने केली.
वाहन ताब्यात घेतल्यानंतर पोनि देविदास शेळके यांनी मुंबई आयुक्तालयाशी संपर्क साधून वाहनाची माहिती दिली. त्यावेळी त्या वाहनाची (क्र. एम.एच.४६- एफ. ५१६२) २ फेब्रुवारी रोजी चोरी झाल्याचे समोर आले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहनाची माहिती मिळताच तळोजा ठाण्याचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी निघाले आहे.

Web Title: The stolen vehicle was found in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.