अंबड येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:56 AM2018-07-27T00:56:17+5:302018-07-27T00:56:34+5:30

 Stop the path at Ambad | अंबड येथे रास्ता रोको

अंबड येथे रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोड नाका येथे सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. सुमारे दोन तास चाललेल्या या चक्का जाम आंदोलनामुळे जालना-बीड रोडवर दोन्ही बाजंूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आषाढी एकादशीपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून अंबड तालुक्यात सोमवारी रास्ता रोको आंदोलन, मंगळवारी संपूर्ण तालुका बंद आंदोलन करण्यात आले,
जामखेडला रास्ता रोको
अंबड तालुक्यातील जामखेड येथे मराठा आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान जामखेड येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी गावातील सकल मराठा समाज व गावकऱ्यांनी अंबड ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेडकर यांच्या उपस्थित बैठकीत ठरलेल्या गाव बंद , राष्टÑीय महामार्ग २११ वर रास्ता रोको आदोलनाची रूपरेषा ठरवली होती. त्यानुसार गुरूवारी हा रास्ता रोको करण्यात आला.
बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून गावातील शाळा, महाविद्यालये बंद होती. मुख्य बाजार पेठही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी गावात शांतता फेरी काढण्यात आली. त्यात समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. मराठा आरक्षणासाठी जलमाधी घेणा-या स्व.काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.

Web Title:  Stop the path at Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.