अन्यायाविरोधात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:13 IST2020-02-04T01:12:37+5:302020-02-04T01:13:27+5:30
राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अन्यायाविरोधात रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
राज्यात मातंग समाजावर अन्याय होत आहेत. अकोला, नांदेड, उस्मानाबादसह इतर ठिकाणावरील मुलींवर अत्याचार व इतर घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी इ. मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे, कासाबाई शिरगुळे, चंद्रकलाबाई गवळी, गोपी घोडे, रमेश दाभाडे, गोरख माळी, शरद चव्हाण, रमेश हाटकर, पांडुरंग नाटकर, बाबासाहेब पाटोळे, सर्जेराव पाटोळे, प्रकाश खंडागळे, समाधान पाचुंदे, कमल भारसाखळे, शिवाजी पाजगे, राजू कांबळे, रमा डोईफोडे, संतोष पारखे, नारायण खरात, संतोष सपकाळ, बाबू साबळे, कमल बरडे, सुनील बरडे, गोंदाबाई बरडे, सुनील बरडे यांच्यासह पदाधिका-यांसह सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.