राजूर-फुलंब्री रोडवर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:26 AM2019-02-04T00:26:56+5:302019-02-04T00:27:33+5:30
जनशक्ती संघनेच्या वतीने शनिवारी राजूर ते फुलब्री मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
दाभाडी : बदनापुर तालुक्यातील हिवरा (दाभाडी) येथील मागील वीस वषार्पासुन पळसखेडा प्रकल्पांअतर्गत पूर्नवसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या निषधार्थ जनशक्ती संघनेच्या वतीने शनिवारी राजूर ते फुलब्री मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
पळसखेडा येथील प्रकल्पाचे मागील वीस वषार्पासुन काम सुरु आहे.या प्रकल्पात परिसरातील अनेक शेतकरी, ग्रामस्थांची शेती, तसेच राहती जागा गेल्याचे शेतकरी सांगत आहे. गावाचे पुर्नवसन करण्याची मागणी करुनही याकडे शासनाचे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दाभाडी ते फुलंबी रस्त्यावर घरे बांधण्यासाठी शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करण्यात आली.मात्र धरणग्रस्तांना हक्काची जागा अद्यापही देण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना मिळेल तेथे राहावे लागत आहे. यामुळे संघनेच्या वतीने शनिवारी राजूर मार्गावर तीस तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार वर्षा पवार यांना दिले. यावेळी यावर गांभिर्याने विचार करण्याची मागणी आंदोलन कर्त्यानी यावेळी केली. लेखी आशवासन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सुधाकर शिंदे ,भुसारे , नारायण गजर , सावळहारी शिंदे , कल्याण गोरे , नारायण मिसाळ , माऊली टेकाळे , ज्ञानेश्ववर बकाल , शिवाजी बकाल, भगवान टेकाळे , गोरख म्हसलेकर , कूषणा बकाल आदी उपस्थित होते.