दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:48 AM2019-05-18T00:48:14+5:302019-05-18T00:49:09+5:30

दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

Stop the sand powders from the milk container | दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना

दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना

Next

परतूर : दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वडगाव पात्रासह इतर वाळू घाटातून रात्रभर अवैध वाळू उपसा होत आहे. सांयकाळचे सात वाजले की, या रोडवर वाळू उपसा करणारी वाहने वेगाने धावतात. या उपशामुळे या रोडची दुरुवस्था झाली आहे. खडी उखडली आहे. शेतकऱ्यांना बैल गाड्यानेनेही अवघड होत आहे.
या रोडवर धुळीचे लोट व उखडलेली खडी यामुळे या परिसरातील शेतकरी व पादचारी त्रस्त झाले आहेत. तसेच काही शेतकºयांच्या शेतातून दमदाटी करून ही वाळूचे वाहने नेले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या उपशाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. तालुक्यात सद्या एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही.
दुधना नदी पात्राची चाळणी होण्याबरोबरच शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तरी हा वाळू उपसा तात्काळ कारवाई करून थांबवावा, अशी मागणी होत आहे.
अवैध रित्या उपसलेली वाळू उघडपणे मेघा इंजिनीयरींगच्या प्लॅटवर होत असल्याचे सांगितल्या जात आहे. या प्लॅटवरून इतरत्र ही वाळू पुरवल्या जाते. या प्लॅटवर जाण्यासाठी शेतकºयांच्या शेतातून रस्ताही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Stop the sand powders from the milk container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.