निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:50 AM2019-07-29T00:50:13+5:302019-07-29T00:50:37+5:30

गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.

Stop supply of inferior wheat - Arjun Khotkar | निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्हा तसेच शहरात रेशन दुकानातून गोरगरिबांसाठी वाटप करण्यासाठी आलेला गहू हा दर्जेदार नसून, तो पावसात भिजल्याने त्या गव्हाला दुर्गंधी येत असून, तो काळा पडला आहे. यामुळे कदाचित आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही भीती लक्षात घेता या गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.
जालना जिल्ह्यात जवळपास तीन हजार ५०० मेट्रीकटन गव्हाचा साठा हा सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात रेशन दुकानांतून करण्यासाठी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. दरम्यान राजूर येथील एका रेशन दुकानात गव्हामध्ये रासायनिक घटक आढळून आल्याने तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने रास्तारोको आंदोलनही केले होते. यावेळी जालना शहर स्वस्तधान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार पंडित, शहराध्यक्ष मंजित कक्कड, शैलेश कक्कड, संकेत पाटील, मनोज जगधने, शाम वाघमारे, फहाद चाऊस, गणेश गूल्लापेल्ली, नंदलाल कक्कड, शाम वाघमारे, दत्ता यमुल, साबेर चाऊस, रवी जयस्वाल, दीलिप जयस्वाल, श्रीकीशन येमूल, विजय मोडे, शुभम बिडकर यांची उपस्थिती होती.
जालना शहरातील जवळपास ३० दुकानांवर हा साठा वितरित करण्यात आल्याचे रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेऊन सांगितले. याची गंभीर दखल घेत खोतकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पुरवठा अधिकारी रिना बसय्ये यांनीही या बद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
या संदर्भात राष्ट्रीय फुड अ‍ॅथोरेटीलाही बोलणार असून, केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याही कानावर ही बाब घालणार असल्याचे खोतकरांनी शिष्टमंडळाला सांगितले.

Web Title: Stop supply of inferior wheat - Arjun Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.