लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचा बुधवारी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:27 AM2019-08-15T01:27:44+5:302019-08-15T01:28:33+5:30
लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भिल आदिवासी समाजाला आधार कार्ड, राशन कार्ड व ग्रामपंचायत पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
भिल आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. आजवर यासाठी सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने रास्तारोको आंदोलन करून प्रशासन, शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. भिल आदिवासी समाजाला आधारकार्ड, राशन कार्ड, ग्रामपंचायत पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, भिल आदिवासी समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
दरम्यान, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल विडंबन केल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्यासह रमेश दाभाडे, चंद्रकलाबाई गवळी, रमेश हाटकर, गोरख माळी, बाबासाहेब पाटोळे, गोपी घोडे, पांडुरंग नाटकर, भास्करराव कांबळे, सर्जेराव पाटोळे, अंबादास गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.