‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:10 AM2019-01-30T01:10:33+5:302019-01-30T01:11:04+5:30
शुक्रवारी एका शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले होते. हे विष घेण्यासाठी त्यांना अनिल चितेकर यांची फूस होती, असा आरोप करून अनिल चितेकरवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रीत अधिकारी कर्मचारी संघ तसेच महसूल संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शुक्रवारी एका शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले होते. हे विष घेण्यासाठी त्यांना अनिल चितेकर यांची फूस होती, असा आरोप करून अनिल चितेकरवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रीत अधिकारी कर्मचारी संघ तसेच महसूल संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला.
तसेच दिवसभर लेखणीबंद आंदोलन करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. अधिकारी, कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली.
जालना तालुक्यातील आंतरवाला सिंदखेड येथील रहिवासी शेतकरी दत्तू कळकुंबे हे त्यांच्या शेतीच्या कामानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयात येत असत, परंतु अनिल चितेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना माझ्या दालनात पाठवले. तसेच त्यांच्या सोबत चितेकर हेही आले होते. कळकुंबे हे निवेदन देऊन परतत असताना चितेकर याने कळकुंबे यांना विष घेण्याचा इशारा केला, तसेच मला धक्काबुक्की करून शिविगाळही केली. अनिल चितेकर यांनी कळकुंबे यांना विष घेण्यासाठीचा केलेला इशारा हा सीसीटीव्हीत कैद असल्याचा उल्लेख निवेदन संघटनेने जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यापूर्वी चितेकर यांनी तत्कालीन तहसीलदार जे.एस.पवार यांनाही मारहाण केली होती. असेही निवेदनात नमूद केल आहे. एकूणच चितेकर यांच्यावर कडकारवाई न केल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी ही शासनाची राहील असे म्हटले आहे.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनावर उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, देवेंद्र कटके, कमलाकर फड यांच्यासह अन्य अधिका-यांच्या स्वाक्षºया असून, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे, राजेश शिंदे, संजय चंदन, संदीब देबडे, विनोद वाघ यांच्यासह अन्य कर्मचाºयांच्या स्वाक्ष-या आहेत. या बंदला काट्राईब, तलाठी तसेच कोतवाल संघटनेनेही पाठिंबा दिला होता.