वीज चोरी थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:32 AM2018-10-28T00:32:42+5:302018-10-28T00:33:52+5:30
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज चोरीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज चोरीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
वीज चोरी होऊ नये म्हणून महावितरण कडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक वेळा आकडे बहाद्दराविरुध्द कारवाई सुध्दा करण्यात आली आहे. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. वीजचोरीमुळे आतापर्यत चार रोहित्र जळल्याने अर्ध्या गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.सणासुदीचे दिवस असल्याने वीजेअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. आझादनगर भागातील दोन रोहित्र, तर जायकवाडी वसाहत ,बँक आॅफ महराष्ट्र परिसर एक रोहित्र तर मुख्य बस स्थानक परिसर भागातील रोहित्र जळालेले आहे. या भागतील नागरिकांनी गावातील इतर रोहित्रावरुन आकडे टाकून वीजेची चोरी करत आहेत. मात्र याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज खंडित होत असल्याने याबाबत नागरिकांनी वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाºयाकडे निवेदन देऊन तक्रारी केल्या गावात कर्मचारी फिरकतच नसल्याने नागरिकात संताप आहे आकडे टाकून वीज चोरीमुळे दुर्घटना होण्याची भीती आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजचोरी थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
४गावात मोठ्या प्रमाणात इतर रोहित्रावरुन आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गावातील इतर रोहित्रावर ताण येत आहे. अनेक वेळा स्पार्किग होत आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीच भीती असते. वीजचोरीमुळे गावातील इतर रोहित्र जळण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.