जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:36 AM2019-06-08T00:36:47+5:302019-06-08T00:36:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना शहरासह परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड या तालुक्यांतील काही गावांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह ...

Stormy rain rains in Jalna district | जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची हजेरी

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची हजेरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरासह परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड या तालुक्यांतील काही गावांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे काही काळ परिसरात गारवा निर्माण झाल्याने ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
परतूर तालुक्यासह आंबा, नांदरा, एकरखा, रोहिना खु, ब्रह्म वडगाव आदी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांवरुन पाणी वाहिले. तसेच मंठा, वाटूर फाटा, अंबड परिसरात वादळी वा-यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
दरम्यान, जालना शहरातही सांयकाळी हलका ते मध्यम स्वरुपाच पाऊस झाला. मागील अनेक दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मृग नक्षत्राच्या दिवशीच पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
वाटुर फाटा : येथे वादळी वा-यासह पावसाने शुक्रवारी पाऊणतास हजेरी लावली. यामुळे वाटूकरकरांना गर्मीपासून दिलासा मिळाला आहे.
परंतु, वादळी वा-यामुळे अनेकांची तारांबळ झाली झाली. तर काही दुकानावरील बॅनर तर घरांवरील पत्रे उडून गेली.

Web Title: Stormy rain rains in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.