मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:40+5:302021-01-23T04:31:40+5:30
गीता नाकाडे : गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पूर्वतयारी जालना : शासन नियमांचे पालन करून पाचवी ते आठवी दरम्यानचे वर्ग २७ जानेवारीपासून ...
गीता नाकाडे : गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पूर्वतयारी
जालना : शासन नियमांचे पालन करून पाचवी ते आठवी दरम्यानचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. परंतु, शाळा सुरू होण्यापूर्वी शासन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी गीता नाकोडे यांनी केले आहे.
पाचवी ते आठवी दरम्यानचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बिट स्तरीय बैठकिचे जालन्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाकाडे बोतल होत्या. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ही बैठक जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी वडगावकर यांनी सर्व शिक्षकांनी आरटीपीसीआर तपासणी करण्याचे
आवाहन केले.
शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, परंतु, पहिली ते चौथीच्या शिक्षकांनी १०० टक्के शाळेत उपस्थित राहावे, मास्क असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले. शाळेत मुलांच्या सुरक्षेसाठी ऑक्सिमिटर, थर्मल गण, सॅनिटायझर, हेअर स्प्रे, हॅन्ड पंप, शाळा फवारणीसाठी सोडियम, हायपोक्लोराईड व मास्क इत्यादी साहित्य उपलब्ध करून घेण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी भरत वानखेडे, कार्ला बीटचे विस्तार अधिकारी जाधव, पिरपिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तिडके, किशोर चव्हाण, बेलदार, पिरकल्याण केंद्राचे केंद्रप्रमुख राजकर, अरुण देशमुख आदींची उपस्थिती होती.