एसटीला १४ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:53 AM2018-06-10T00:53:28+5:302018-06-10T00:53:28+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील चार आगारांमधील ३६३ पैकी २५७ फे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी दुस-या दिवशीही प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील चार आगारांमधील ३६३ पैकी २५७ फे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.
संपामुळे दोन दिवसात चार आगारांचे सुमारे १४ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, काँग्रसने एसटी कर्मचा-यांचा संपास पाठिंबा दिला.
जालना बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना परत जावे लागले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटीचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दोन दिवसात चारही आगारांचे मिळवून सुमारे १४ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटीचे विभागीय नियंत्रण यु. बी . वावरे यांनी दिली. तसेच २९ कर्मचा-यावंर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.