पट्ट्यातील बातम्या ४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:26+5:302021-01-17T04:26:26+5:30
कुंभार पिंपळगाव : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी शुक्रवारी सकाळी कुंभार पिंपळगाव येथे दिंडी, रथयात्रा काढण्यात ...
कुंभार पिंपळगाव : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी शुक्रवारी सकाळी कुंभार पिंपळगाव येथे दिंडी, रथयात्रा काढण्यात आली. महारूद मंदिरापासून टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी, रथयात्रेला सुरुवात झाली. गावात रस्त्यांवर जागोजागी रांगोळी काढण्यात आल्या होत्या. महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, तुळजाभवानी मंदिर, लहान मारोती, मेन रोड, गणपती गल्ली, साठेनगर मार्गे दिंडी फाट्यावर पोहोचली.
विशाल इंगळे यांचा सत्कार
जालना : जाफराबाद तालुक्यातील आसई येथील विशाल इंगळे यांनी १६व्या राष्ट्रीय तर २२व्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत यश मिळविलेले आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. इंगळे २००८ पासून तिरंदाजी खेळाचा सराव करतात. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत राज्याला १४ सुवर्ण पदके मिळवून दिलेली आहेत.
फोटो
डाॅ.काकडे यांची पुरस्कारासाठी निवड
मंठा : परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत असलेले डॉ.अमोल काकडे, यांची इंटरनॅशनल सायंटिस्ट अवाॅर्ड २०२१ साठी इंजिनीयरिंग सायन्स व मेडिसिन या गटातून निवड करण्यात आलेली आहे. डॉ.अमोल काकडे यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीमार्फत जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड येथून एम.एसी (कृषी कीटकशास्त्र) व नवसारी, गुजरात येथून आचार्य पदवी मिळलेली आहे. या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
व्यसनमुक्तीबाबत संदेश देणाऱ्या रांगोळीचे रेखाटन
अंबड : तालुक्यातील बारसवाडा प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर विद्यार्थिनी आरती मोढेकर, गायत्री घोडके यांनी व्यसनमुक्तीवर आधारित रांगोळी रेखाटून सामाजिक संदेश दिला. यावेळी बीएलओ श्रीधर कुलकर्णी, एम.एम. गोल्हार, वाय.बी. बळी आदी उपस्थित होते.
आष्टीत जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रम
आष्टी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम. खंदारे, मनोज उबरहंडे, बी.ए. काळे, एस.एन. वाकळे, एस.के.गीते, ए.एम. जाधव, एम.डी. मोरे, एच.एम. राठोड, समशेर शेख आदींची उपस्थित होते.
छत्रपती संभाजी उद्यान खुले करण्याची मागणी
जालना : शहरातील लहान-थोरांचे एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण असलेले छत्रपती संभाजी उद्यान अर्थात मोतीबाग कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे, शिवाय मंगल कार्यालये, चित्रपटगृहे मंदिरे, अन्य सार्वजनिक ठिकाणे सर्वसामान्यांना खुली करण्यात आली आहे. त्यामुळे नगरपालिकेने मोतीबाग खुला करावा, अशी मागणी होत आहे.
विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे मुंबई येथे आंदोलन
जालना : उच्च माध्यमिक, माध्यमिक, प्राथमिक शाळा, महाविद्यालये व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांवर २० ते २५ वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहे. या शिक्षकांना तातडीने अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अघोषित उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात १९ जानेवारीपासून आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर योगेश नदन, बाबासाहेब नागरगोजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे गोमातेला ढेप वाटप
जालना : रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने वृंदावन गोसेवा धाम येथे गोमातेला ढेप व गूळ देण्यात आला. याप्रसंगी पवन जोशी, अनिल तलरेजा, डॉ.कैलास दरगड, संतोष लिंगायत विजय दाड, इंद्रजीत जाधव यांची उपस्थिती होती.
७६ टक्के मतदान
जाफराबाद : तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ७६.८६ टक्के मतदारांनी मतदान केले. ४ हजार २२७ पैकी ३ हजार २४९ जणांनी मतदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.
मागण्यांचे निवेदन
जालना : जिल्हा परिषदेंतर्गत असणाऱ्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला निवृत्ती वेतन द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
घनसावंगीत उत्साह
जालना : घनसावंगी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान झाले. अटीतटीच्या या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सर्वत्र चुरस दिसून आली. परिणामी, मतदानांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.