कृषी विधेयकाला कडाडून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 07:01 PM2020-09-25T19:01:33+5:302020-09-25T19:02:48+5:30
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले.
राजूर : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक अध्यादेशासह पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला.
अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टेंभुर्णी- नळणी फाट्यावर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात या भागातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे टेंभुर्णी, राजूर, नळणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बंगाळे यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करीत मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवी कदम, प्रसिध्दी प्रमुख दीपक वाघ, तालुका उपाध्यक्ष संतोष कदम, भारत मगरे, भगवान पिंपळे, भाऊसाहेब लोखंडे, बाबासाहेब गव्हाड, भगवान मारग, गंभीरराव शेरकर, राम जाधव, समाधान पिंपळे, रामदास पिंपळे, प्रभाकर पिंपळे, रमेश शेरकर, ज्ञानेश्वर पिंपळे, समाधान शेरकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.