समुदेशन पद्धतीने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:23+5:302020-12-30T04:41:23+5:30
यासाठी आठ शासकीय आणि चार खाजगी आयटीआयच्या प्राचार्य तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे पथक नेमून हे प्रवेश निश्चित केले जात आहेत. ...
यासाठी आठ शासकीय आणि चार खाजगी आयटीआयच्या प्राचार्य तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे पथक नेमून हे प्रवेश निश्चित केले जात आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवा म्हणून मोठी गर्दी आयटीआयमध्ये केली होती. बुधवारी याची दुसरी फेरीदेखील सकाळी नऊ वाजेपासूनच सुरू होणार आहे. प्राचार्य देवीदास राठोड, प्राचार्य परमेश्वर खोकले, प्राचार्य गणेश भावले, प्राचार्य केशव पवार, प्राचार्य शिवकुमार जुमनाके, गट नदेशक दइस जाधव, बी.डी. वाणी, सुधीर कापसे आदी अधिकारी, कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
चौकट
विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी चुरस
मध्यंतरी कोरोना आणि नंतर सुरू झालेले कनिष्ठ महाविद्यालय यामुळे आयटीआय ऐवजी दुसरीकडे अनेकांनी प्रवेश घेतला होता; परंतु ज्यांना खरोखरच आयटीआयचे शिक्षण घ्यायचे आहे, ते विद्यार्थी आता या समुपदेश राऊंडमध्ये आले आहेत. त्यामुळे यातून प्रवेश देताना जे मेरिट आहेत, अशांनाच प्रवेश मिळणार असल्याची माहिती प्राचार्य देवीदास राठोड यांनी दिली.