जिल्ह्यात आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची होतेय मोठी दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:37+5:302021-07-27T04:31:37+5:30
ऑनलाइन नोंदणी : दहावीच्या गुणपत्रिकेमुळे अडचणीत वाढ लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून, आयटीआयमध्ये ...
ऑनलाइन नोंदणी : दहावीच्या गुणपत्रिकेमुळे अडचणीत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून, आयटीआयमध्ये सरासरी दोन वर्षांचा ट्रेड पूर्ण केल्यानंतर लगेचच नोकरी मिळण्यासह बँकांकडून स्वत: उद्योग सुरू करण्यासाठी तातडीने कर्ज उपलब्ध होते. यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे असल्याचे दिसून येते.
जालना जिल्ह्यात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. यामुळे जवळपास चारशे ते पाचशेपेक्षा अधिक उद्योग येथे आहेत. यामुळे आयटीआय केलेल्या उमेदवारांना मोठी मागणी असून, जालन्याप्रमाणेच पंजाब, गुजरात, हरयाणा, नाशिक येथील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाल्या.
महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम
जिल्ह्यातील जवळपास सर्वच आयटीआयमध्ये सारखे ट्रेड आहेत.
या ट्रेडपैकी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, टर्नर, फिटर यांना अधिकची मागणी आहे.
दुसरीकडे मोटार मॅकेनिक, मुलींसाठी फॅशन डिझायनिंग, सिव्हिल ड्राफ्टट्समन, संगणक अभ्यासक्रम यालाही आता प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थी आयटीआयकडे वळत आहेत.
विद्यार्थी म्हणतात....
दहावी झाल्यानंतर दोन वर्षे आयटीआय केल्यावर लगेचच १५ ते २५ हजार रुपयापर्यंतच्या मासिक वेतनाची नोकरी मिळते. खात्रीशीर रोजगार मिळवून देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयकडे पाहिले जात आहे.
- मोनू ठाकूर
मध्यंतरी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊनही नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या. हा अनुभव लक्षात घेऊन आयटीआयला प्राधान्य देण्याचे आपण ठरवले आहे. यामुळेच आपण प्रवेशासाठी नावनोंदणी केली आहे.
- वैभव मानवतकर
गतवर्षी पूर्ण क्षमतेने प्रवेश
n रोजगाराची हमी असल्याने गेल्या वर्षीदेखील आयटीआयचे प्रवेश पूर्ण क्षमतेने झाले.
n आयटीआयमध्ये हरयाणा, गुजरात, नाशिक येथून कंपन्यांचे कॅम्प्स इंटरव्ह्यू झाले आहेत.
n हक्काचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीआयचे प्रमाणपत्र असल्यास कर्ज मिळते.