फार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:02 AM2018-06-25T01:02:47+5:302018-06-25T01:03:51+5:30

दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.

Students lean on pharmacy, technical education | फार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

फार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दहावी आणि बारावीचे निकाल लागून आता विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि टीसी मिळाली आहे. त्यामुळे आयटीआयसह अभियांत्रिकी आणि अन्य विद्या शाखांमध्ये प्रवेशाची लगीनघाई दिसून येत आहे. दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.
एकूणच जालना शहर व जिल्ह्यात सध्या सर्वत्र प्रवेशोत्सव सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, परंपरागत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, अनेकांनी याला पर्याय म्हणून ठेवले असून, अनेकांचा कल हा आयटीआय तसेच अभियांत्रिकीसह औषध निर्माण शास्त्र विभागाकडे आहे. या संदर्भात आयटीआयचे प्राचार्य डी.बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आयटीआयमध्ये केवळ ३८८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची क्षमता आहे. परंतु प्रवेश सुरू होऊन तीनच दिवस झाले असले तरी, एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश नोंदणीसाठी ३० जून अंतिम तारीख आहे. यावेळ पर्यंत किमान तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. हे अर्ज आल्यावर त्याची छाननी होऊन कुठल्या ट्रेडसाठी संबंधित विद्यार्थी पात्र आहे, याचा तपशील गोळा केल्यावर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार असल्याचे ते म्हणाले.
येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीचे नोंदणी केंद्र होते. तेथे अभियांत्रिकीसह फार्मसी अभ्यासक्रमासाठीची नोंदणी करण्यात आली असून, २२ जून पर्यत ७२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती प्राचार्य बिरदार यांनी दिली.
जालना : तंत्रनिकेतनचे यंदा सबकुछ आॅनलाईन
शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा पूर्वीप्रमाणे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जे किट देण्यात येते ते बंद केले आहे. यंदा सर्व प्रवेश हे आॅनलाईन होणार आहेत. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड देण्यात येणार आहे. पासवर्ड दिल्यावर विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठीचे शुल्क देखील आॅनलाईन भरावयाचे आहे. पूर्वी ज्या प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांचे डिमांड ड्राप्ट लागत असत, ते आता बंद केले असून, पेमेंट बँक अथवा डेबीटकार्डच्या माध्यमातून विद्यार्थी शुल्क भरू शकतात. तसेच आता बँकांनी डीडी कॅन्सल करायचा झाल्यास त्याचे चार्जेस भरमसाठ वाढवले आहेत. एक हजार रूपयांचा डीडी. रद्द करायवा झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे जवळपास २६७ रूपये कापले जात आहेत.
विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला बायोमेट्रीक हजेरीचा धसका
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी ही बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खासगी क्लासमध्ये जातांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे फारसे काही हाती लागणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. दहावी तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांना सीईटीमुळे काहीच किंमत नसल्याने महाविद्यालयाच्या हजेरीवर त्याचा परिणाम झाला आहे. बायोमेट्रिकचा निर्णय यापूर्वीही झाला होता, त्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Students lean on pharmacy, technical education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.