गणवेशाविनाच विद्यार्थ्यांची शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:42+5:302021-02-05T07:57:42+5:30
जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शासनाकडून गणेवेश दिले जाता. दरम्यान, दोन टप्प्यांत हे गणवेशाचे पैसे देण्यात ...
जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शासनाकडून गणेवेश दिले जाता. दरम्यान, दोन टप्प्यांत हे गणवेशाचे पैसे देण्यात येतात, परंतु यंदा केवळ ३०० रुपयांचा एक टप्पा हा विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा केले आहेत, तर दुसरा टप्पा अद्याप केंद्र सरकरकडून अद्याप आला नसल्याचे सांगण्यात आले.
एकूणच जिल्ह्यात जवळपास दीड हजार प्राथमिक शाळा असून, जवळपास एक लाख दहा हजार विद्यार्थी यात शिक्षण घेतात. गरीब विद्यार्थ्यांना केंद्राकडून गणेवेशासाठी ६०० रुपये हे जून ते जुलैमध्येच देतात येतात, परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळाच सुरू नव्हत्या. त्यामुळे हा निधी राखून ठेवला होता, तसेच शाळेत विद्यार्थी येत नसल्याने गणेवश शिवण्यासाठी त्यांचे माप घेणेही लांबणीवर पडले आहे. याचा मोठा फटका हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बसला आहे.
या संदर्भात शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ याांना विचारले असता, ते म्हणाले की, एक ३०० रुपयांचा टप्पा आम्ही पालकांना दिला असून, दुसरा निधीचे पैसे अद्याप आलेले नसून, ते आल्यावर लगेचच खात्यात वर्ग करण्यात येतील, परंतु आता शाळांच्या परीक्षा होऊन पुन्हा उन्हाळी सुट्टी लागणार असल्याने हा निधी आता जूनमध्ये मिळेल, अशी आशा आहे.