दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:43 AM2019-02-15T00:43:04+5:302019-02-15T00:43:24+5:30
नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ९७ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन, हा निधी तातडीने शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती विहित वेळेत संकलित करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
दुष्काळी निधी वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच क्रीडा विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, तहसीलदार बिपीन पाटील, कदम, सुमन मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी खतगावकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, २०१८ च्या खरीप हंगामात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीची रक्कम दोन टप्यात देण्यात येणार आहे. राज्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ९०० कोटी आणि दुसºया टप्प्यात २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही नुकतीच राज्याला दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्यात वितरित करण्यात आला आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये कमाल २ हेक्टरपर्यंत मदत, कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराने ५० टक्के म्हणजे ३ हजार ४०० रुपये बहुवार्षिक पिकांसाठी प्रथम हफ्ता ८ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ५० टक्के म्हणजे ९ हजार रुपये प्रत्येक शेतकºयांना ही भरपाई मिळेल.
१५ दुष्काळी अनुदान वाटपासंदर्भात जालना जिल्ह्यातील ८५४ गावातील ७५ हजार ४३३ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून ४० हजार ७९१ शेतक-यांच्या खात्यावर १५ कोटी ९५ लक्ष ४९ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती संकलित करण्यात येत असून, आजपर्यंत जिल्ह्यातील ९७१ गावांपैकी ३७८ गावातील एक लाख ४० हजार ९२३ शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी यावेळी दिली.