सोलार प्रकल्पासाठी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:13 AM2018-04-25T01:13:28+5:302018-04-25T01:13:28+5:30

निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

Submit report for Solar project | सोलार प्रकल्पासाठी अहवाल सादर करा

सोलार प्रकल्पासाठी अहवाल सादर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. निम्न दुधना प्रकल्प धरणाच्या भिंतीवर व कॅनॉलवर सोलार प्रकल्प उभारण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, कार्यकारी अभियंता नितीन बनसोड, महापारेषणचे एस. जी. बागडे, महाजनकोचे व्ही. एस. लोणीकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले, भविष्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात सोलार शिवाय पर्याय राहणार नाही. राज्यात २५० मेगावॅटचे सोलार प्रकल्प उभारण्याचे यापूर्वीच केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून प्रकल्पाच्या किंमतीच्या ३० टक्के निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात शासकीय जमीन उपलब्ध आहे. परंतू शासनाच्या अनेकविध प्रकल्पांसाठी शासकीय जागेची गरज लक्षात घेता सोलार प्रकल्प हा निम्न दुधना प्रकल्पाच्या भिंतीवर, कॅनॉलवर करणे सोईचे राहणार आहे.
सोलारमुळे प्रकल्पातील होणारे बाष्पीभवन रोखून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्याचप्रमाणे कालव्याच्या भिंतीवर शेवाळ, बुरशी, कवळ होण्यापासून बचाव होऊन कालवा, भिंतीचे आयुष्य वाढण्यास मदत होण्याबरोबरच पाणीही यामुळे स्वच्छ राहणार आहे. यावेळी राहूल देशपांडे यांनी सौरऊर्जा प्रकल्पाबाबतच्या माहितीचे पॉवर पॉइंटच्या माध्यमातुन सादरीकरण केले. या बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.

Web Title: Submit report for Solar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.