अनुदानित केरोसिन आता पॉस मशीनव्दारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:04 AM2018-10-08T01:04:32+5:302018-10-08T01:06:59+5:30

धान्य पाठोपाठ अनुदानित केरोसिन आता पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Subsidized Kerosene Now By POS Machine | अनुदानित केरोसिन आता पॉस मशीनव्दारे

अनुदानित केरोसिन आता पॉस मशीनव्दारे

Next

गजानन वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : धान्य पाठोपाठ अनुदानित केरोसिन आता पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख लाभार्थ्यांपैकी गॅस कनेक्शन नसलेल्या जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून केरोसिन वितरणासाठी पॉस (पॉइंट आॅफ सेल डिव्हाईस) यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधारकार्ड जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिन मिळणार आहे. दुकानातील ई -पॉस मशिनव्दारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार अ‍ॅथलिकेशन झाले असल्यास केरोसिन मिळणार आहे. ई- पॉस मशिनवर शिधापत्रिकेची माहिती उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका आधार नोंदणी प्रत, शासकीय, छायांकीत ओळखीच्या माध्यमातून केरोसिन उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. ज्या केरोसिन विक्रेत्याकडे ई- पॉस यंत्रणा बसविण्यात आली नाही. अशा विक्रेत्यांनी शिधापत्रिका धारकाकडून आधार क्रमांक केरोसिन विक्रीबाबत पावतीवर लाभार्थ्याचे नाव व शिधापत्रिका क्रमांक नोंद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्या पावतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी त्याचबरोबर घोषणापत्र देखील केरोसिन विकत घेताना द्यावे लागणार आहे. गॅस जोडणी असल्यास केरोसिन शिधापत्रिकाधारकांना अनुदानित दराने केरोसिन दिल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूर देखील करण्यात आली आहे. बिगर गॅस जोडणी धारकांनाच केरोसिन मिळावे या मागचा हेतू आहे.
केरोसिन
विक्रेत्यांमध्ये धास्ती
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे केरोसिन विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे विक्रेते आणि ग्राहकांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हमीपत्र द्यावे लागणार
रेशनकार्ड धारकांना केरोसिन विकत घ्यायचे आहे. अशा ग्राहकांनी आपल्याकडे गॅस नसल्याचे हमीपत्र रेशन दुकानदारास द्यावे लागणार आहे.

Web Title: Subsidized Kerosene Now By POS Machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.