भुयारी मार्गाचा चेंडू पालिकेकडे टोलवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 01:05 AM2020-01-30T01:05:49+5:302020-01-30T01:06:42+5:30

रेल्वे स्थानकापासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या रेल्वे मार्गावर सरस्वती कॉलनीकडे जाण्यासाठी तसेच तेथून जुना जालना भागात येण्यासाठी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे

 Subway is bowled | भुयारी मार्गाचा चेंडू पालिकेकडे टोलवला

भुयारी मार्गाचा चेंडू पालिकेकडे टोलवला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेल्वे स्थानकापासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या रेल्वे मार्गावर सरस्वती कॉलनीकडे जाण्यासाठी तसेच तेथून जुना जालना भागात येण्यासाठी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रस्तावित मार्ग पालिकेकडून नाला बांधकाम केले जात नसल्याने लांबल्याची माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंह यांनी दिली.
जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन बुधवारी देण्यात आले. उपेंद्रसिंह यांनी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत जालना रेल्वे स्थानकावर थांबून अधिकाऱ्यांची बैठक तसेच सुरू असलेल्या विविध कामांना भेटी देऊन सूचना केल्या. यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी फेरोज अली मौलाना यांनी भुयारी रेल्वे मार्गासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वे प्रशासन हा मार्ग तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. जालना पालिकेने सहकार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

Web Title:  Subway is bowled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.