'अचानक आमच्या अंगावर दगड पडायला सुरुवात झाली, पोलिसांनी सांगितलं जालन्यात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:23 PM2023-09-03T23:23:06+5:302023-09-03T23:23:34+5:30
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले आहेत. यात पोलिसांवर आंदोलकांनी लाठीचार्जचा आरोप केला आहे, तर आता दुसरीकडे पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातील काही पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत या पोलिसांनी आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ स्वीकारला पदभार
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आम्ही नियंत्रण कक्षेतून जाताना व्यवस्थित गेलो. तिथे हॉस्पिटलाईज करण्यासाठी गेलो होतो, तिथे नेमकं काय होणार आहे याची माहिती नव्हती. समोर महिला होत्या म्हणून आम्हीही महिला समोर होत्या. अचानक दगडफेक सुरू झाल्यामुळे आम्ही जखमी झालो आहोत. समोरुन दगडफेक सुरू झाल्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्जची आम्हाला वरिष्ठांनी ऑर्डर दिली होती, अशी माहिती महिला पोलिसांनी दिली.
एकुण ६४ पोलिस जखमी झाले आहेत. काही पोलिस घराजवळच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अवस्थेतही हे पोलिस काम करत आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.
जालना येते झालेल्या हल्ल्यात पोलिसांसह नागरिकही उपचार घेत आहेत.
शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP
पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी रविवारीच दुपारी पदभार स्वीकारला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. ३१ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हवेत गोळीबारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून, अनेकठिकाणी जाळपोळ झाली. शिवाय, जालना शहरातही शनिवारी जाळपोळ झाली होती.
आंदोलनकांनी दगड फेक केली होती. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून, त्यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर लगेच शैलेश बलकवडे यांनी दुपारी पदभार स्वीकारला आहे.