स्पार्किंगमुळे चार एकरातील ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:32 AM2017-12-10T00:32:17+5:302017-12-10T00:32:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक झाला. अंबड तालुक्यातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे उसाला आग लागल्याची ही महिनाभरातील चौथी घटना असल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शिवाजीनगर येथील तुकाराम तुळशीराम आदमाने, सखाराम तुळशीराम आदमाने व पांंडुरंग जालिंदर आदमाने यांनी गहिनीनाथनगर शिवारातील गट क्रमांक चारमध्ये उसाची लागवड केली आहे. शुक्रवारी सायंकाळी शेतावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतक-यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अन्यथा पाच हेक्टरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला, असे तुकाराम आदमाने यांनी सांगितले. लोंबकळलेल्या तारांसंदर्भात अनेकदा तक्रार करूनही महावितरणच्या अधिका-यांनी दखल न घेतल्यामुळे चार लाखांचे नुकसान झाले असे आदमाने यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी महावितरणच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या महिन्यामध्ये विद्युत तारांमध्ये घर्षण ऊस जळाल्याच्या चार घटना घडल्या असून, शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.