रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा ऑक्सिजनवर : उत्पादक कंपन्या वाढूनही टंचाई कशी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:38+5:302021-04-10T04:29:38+5:30
दुसरीकडे ज्यावेळी कोरोना भारतासाठी नवीन होता, त्यावेळी देशात केवळ एकाच कंपनीकडून या रेमडेसिवीरचे उत्पादन होत होते. ते पुरतही होते. ...
दुसरीकडे ज्यावेळी कोरोना भारतासाठी नवीन होता, त्यावेळी देशात केवळ एकाच कंपनीकडून या रेमडेसिवीरचे उत्पादन होत होते. ते पुरतही होते. परंतु आज या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्याही सहापेक्षा अधिक आहे. त्यात देशात केवळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्येच जास्त कोरोना रूग्ण आढळून येत आहे. केवळ तीन राज्यांतच हा प्रादुर्भाव असताना रेमडेसिवीरची टंचाई निर्माण होतच कशी, असे मत कोरोना क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी बोलून दाखविले.
जालन्यात प्रशासनाची कसरत
आहेत, त्या इंजेक्शनचे वितरण हे विविध शासकीय तसेच खासगी रुग्णायात उचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना पुरविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. परंतु येथील डॉक्टर आणि केमिस्ट यांचे सहकार्य मिळत असल्याने दिलासा मिळत असल्याचे सांगण्यात आले. कोरोना रुग्णांना विषाणू प्रतिरोधक इंजेक्शन म्हणून रेमडेसिवीरचा डोस दिला जात आहे. हा डोस देताना त्याला प्रचंड मागणी आहे. कोरेाना झालेल्या रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस दिले जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने खासगी असो की, सरकार रुग्णालये हेच इंजेक्शन घेण्यासाठी सुचवितात. त्यामुळे मागणी वाढल्याचे सांगण्यात आले.
चौकट
काळ्या बाजारावर बारकाईने लक्ष
जालन्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा काळा बाजार अर्थात चढ्या दराने विक्री होण्याची भीती आहे. ही बाब गंभीर असून, या मुद्द्यावर अन्न आणि औषध प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. जालन्यात हे इंजेक्शन केवळ एक हजार ४०० रुपयांनाच मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.