आरक्षणाच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:33+5:302021-02-05T07:57:33+5:30

वडीगोद्री : मराठा समाजातील बहुतांशी वर्ग हा शेतकरी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ...

Swabhimani Shetkari Sanghatana supports the reservation movement | आरक्षणाच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

आरक्षणाच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

Next

वडीगोद्री : मराठा समाजातील बहुतांशी वर्ग हा शेतकरी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी २० जानेवारीपासून गावकऱ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन हाती घेतले होते. या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण सुरू होते. आमरण उपोषण मागे घेऊन आता साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांना तुपकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

यावेळी तुपकर म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम सोबत आहे. या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण नसल्याने त्यांना पूर्ण शुल्क भरावे लागते; परंतु बहुतांश शेतकऱ्यांची परिस्थिती ही हलाखीची असल्याने ते शैक्षणिक शुल्क भरू शकत नाहीत. परिणामी मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही. मराठा समाजाचे नेतेच आरक्षणाच्या प्रश्नावर असंवेदनशील असल्याचे दिसून येते. मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट न बनवता तो मार्गी लावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, भारत उंडे, संजय कटारे, राजेंद्र खटके, दिगंबर तारख, गणेश गावडे, अंकुश तारख, नारायण डहाळे, किशोर फटाले, सोमनाथ काळे आदी उपस्थित होते.

........फोटो

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana supports the reservation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.