कोंबिंग आॅपरेशनमध्ये तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:03 PM2019-09-28T23:03:05+5:302019-09-28T23:03:29+5:30

एडीएसच्या पथकाने शहरातील गुरू गोविंदसिंग नगर भागात गुरूवारी मध्यरात्री कोंबिंग आॅपरेशन राबवून एका घरातून धारदार तलवार जप्त केली.

Sword seized in combing operation | कोंबिंग आॅपरेशनमध्ये तलवार जप्त

कोंबिंग आॅपरेशनमध्ये तलवार जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एडीएसच्या पथकाने शहरातील गुरू गोविंदसिंग नगर भागात गुरूवारी मध्यरात्री कोंबिंग आॅपरेशन राबवून एका घरातून धारदार तलवार जप्त केली. यावेळी विविध गुन्ह्यात असलेल्या सराईत गुन्हेगारासही ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव व त्यांची टीम रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरूध्द कोंबिंग आॅपरेशन राबवित आहे. याच धर्तीवर गुरूवारी मध्यरात्री जालना शहरातील गुरू गोविंदसिंग नगर भागात राहणारा विविध गुन्ह्यातील आरोपी किसनसिंग रामसिंग टाक याच्या घरी कारवाई केली. यावेळी त्याच्या घरातून तीन हजार रूपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी टाक विरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाक विरूध्द शहरातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोड्यांचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम. बी. स्कॉट, पोना सुभाष पवार, नंदकिशोर कामे, पोकॉ संदीप चिंचोले, श्रीकुमार आडपे आदींच्या पथकाने केली.
अटकेतील आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ गिरी या करीत आहेत.

Web Title: Sword seized in combing operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.