कोरेगाव-भीमा घटनेतील दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:49 AM2018-01-06T00:49:26+5:302018-01-06T00:49:34+5:30
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा, यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा, यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
मोर्चा काढण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शासकीय विश्रामगृह परिसरात उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. वडू बुद्रूक व कोरेगाव येथील घटनेत मराठा समाजाने कुठलेही गैरवर्तन केले नाही. या प्रकराचा समाजाने निषेधच केला. मराठा समाजाच्या दोन तरुणांची हत्या झालेली असताना, समाजाने संयम दाखवत कायदेशीर चौकशीची मागणी केली. मात्र असे असतानाही समाजातील काही व्यक्तींच्या घरांना, वाहनांचे नुकसान करण्यात आले, असे पदाधिकाºयांनी यावेळी सांगितले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा (पान २ वर)