स्वतःच्या मुलाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्या : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:43+5:302021-03-01T04:34:43+5:30

जालना तालुक्यातील कारला येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शिपाई नंदकिशोर वाहूळकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते ...

Take care of school children like your own child: Black | स्वतःच्या मुलाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्या : काळे

स्वतःच्या मुलाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्या : काळे

Next

जालना तालुक्यातील कारला येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शिपाई नंदकिशोर वाहूळकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.

काळे पुढे म्हणाले की, वर्षभरापासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना शैक्षणिकदृष्ट्या हे वर्ष चांगले म्हणता येणार नाही. परंतु आहे त्या स्थितीत ज्ञानदानाचे कार्य शिक्षकांनी करावे. शाळेतील कर्मचाऱ्यांनी सेवाभाव जपत चांगले कर्तव्य पार पाडावे, असेही ते म्हणाले. यावेळी सेवानिवृत्त नंदकिशोर वाहुळकर यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका ए. एम. शिरसवाल, सेवानिवृत्त प्राचार्य के. बी. लहाने, सेवानिवृत्त पर्यवेक्षक डी. एस. दीक्षित, एस. जे. सुखदाने, प्राध्यापक सचिन वाघ, के. वाय. घारे, बी. बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन के. वाय. घारे यांनी केले. बी. बी. जाधव यांनी आभार मानले.

===Photopath===

280221\28jan_17_28022021_15.jpg

===Caption===

 कारला येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात बोलतांना कृषिभूषण भगवानराव काळे व इतर. 

Web Title: Take care of school children like your own child: Black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.