पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:16 AM2018-04-07T00:16:48+5:302018-04-07T00:16:48+5:30
पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या.
जिल्हा परिषद सभागगृहात शुक्रवारी आ. टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील ४२ गावांमधील पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार डॉ. विपिन पाटील, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, रामधन कळंबे, पांडुरंग डोंगरे, राम सावंत, सोपान पाडमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील घनसावंगी मतदार संघातील गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती. गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी वारंवार लेखी पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी कर्मचारी या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याच्या तक्रारी सरपंचांनी केल्या. यावर टोपे यांनी ग्रामसेवक, तलाठी व संबंधित अधिका-यांनी विशेष लक्ष देऊन पाणी टंचाई असणा-या गावांमध्ये टँकर सुरू करण्यासह विहिरी अधिग्रहण, प्रलंबित योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विहिरी अधिग्रहणाचे पैसे संबंधितांना तात्काळ देण्यास सांगितले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य राम सावंत, सोपान पाडमुख, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता डाकोरे, उपअभियंता ससाणे, विस्तार अधिकारी जायभाये, पंचायत समिती सदस्य संतोष मोहिते, प्रकाश टकले, रामेश्वर काळे, खरात यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.