शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:20 AM2018-02-17T00:20:19+5:302018-02-17T00:20:28+5:30

छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सुभान अली शेख यांनी केले.

Take the views of Shivaji Maharaj into consideration | शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा

शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा

googlenewsNext
ठळक मुद्देसुभान अली शेख : भोकरदन येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सुभान अली शेख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्त भोकरदन येथे शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, उपनगराध्यक्षा इरफानउद्दीन सिद्धिकी, सुरेश तळेकर, शेख कदीर, उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल देशमुख, नंदकुमार गिºहे, नारायण जिवरग, बबन जंजाळ, विष्णू गाढे, गणेश इंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सुभान अली शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हते. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचे काम केले. मात्र, अलिकडच्या काळात शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. कुठल्याही समाजातील श्रीमंत व्यक्ती किंवा राजकारणी नेत्यांची गरीब शेतकरी व कष्टकºयांच्या मुलांच्या शिक्षण किंवा मुलींच्या विवाहासाठी सढळ हाताने मदत करण्याची गरज असून, आपण सुध्दा विवाहामध्ये हुंडा घेण्याची किंवा देण्याची पध्दत बंद केली पाहिजे. शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उस्मान शेख व शेख फातिमा, अण्णा भाऊ साठे यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपण शिक्षण घेऊन इतिहासाची माहिती घेऊ शकलो.
यावेळी विनोद मिरकर, गजानन घोडके, विजय चिंचपुरे, दीपक पाटील, प्रतीक नवले, प्रदीप जोगदंडे, दिनेश पडोळ, रवि सुरवसे, विशाल मिसाळ, आप्पा जाधव, सुरज सहाने, वाजेद शहा, शामराव दांडगे यांच्यासह भोकरदन तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: Take the views of Shivaji Maharaj into consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.