तळणी जि.प. शाळेची बीडीओंकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:19 AM2018-10-09T01:19:13+5:302018-10-09T01:19:46+5:30
मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी तब्बल ७ शिक्षक गैरहजर आढळून आल्याने शाळेचा कारभार रामभरोसे सुरु होता. सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी तब्बल ७ शिक्षक गैरहजर आढळून आल्याने शाळेचा कारभार रामभरोसे सुरु होता. या बाबतचे वृत्त लोकमत मधून प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने सोमवारी शाळेला भेट देऊन तपासणी केली.
सोमवारी मंठ्याचे गटशिक्षणाधिकारी एम. डी. राठोड यांनी शाळेला भेट देऊन तपासणी केली.
या तपासणीत जे. डी. वायाळ हे जालना येथे प्रतिनियुक्तीवर असून एम. वाय. बेग हे शिक्षक क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जालना येथे गेले होते. ए. एन. पवार शाळेवर उशिरा आल्याचे आढळून आले. तर ५ शिक्षक रजेवर आढळून आले. यावेळी पोषण आहार मेनूकार्ड प्रमाणे दिला जातो का, याची चौकशी केली. शाळेतील स्वच्छ परिसर पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे व गटसमन्वयक के जी राठोड उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शाळेतील अवस्था अशीच असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लोकमतचे वृत्त ठरले खरे
गटशिक्षण अधिका-यांच्या तपासणीत अनेक शिक्षकांनी काही ना काही कारण सांगून शाळेत येण्याचे टाळले होते. या बाबत लोकमतने वृत्त जे वृत्त प्रसिध्द केले होते, त्यात तथ्य असल्याचा अभिप्रायही दिला.