जालना जिल्ह्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:18 AM2018-05-06T01:18:10+5:302018-05-06T01:18:10+5:30

राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Targeting 28 lakh trees in Jalna district | जालना जिल्ह्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

जालना जिल्ह्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
वृक्षलागवडीसाठी वेगवेगळ्या विभागांना त्यांनी किती वृक्ष लागवड करावी यासाठीचे नियोजन वनविभागाने केले असल्याची माहिती वनविभागातील कान्हेरे यांनी दिली. एकूणच आमच्या वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांची एक बैठक होऊन त्यांच्या सूचनेनुसार हे उदिष्ट ठरवल्याचे कान्हेरे यांनी सांगितले.
यात वनविभागाने साडेचार लाख, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सर्वात जास्त म्हणजे १० लाख वृक्ष लागवड करावयाची आहे. कृषी विभागाला ५ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले असून, यात नगर विकास, औद्योगिक, जलसंपदा, उच्व व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना मिळून हे २८ लाख वृक्ष लागवड करावायची आहे. यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून झाडे लावण्यासाठीचे खड्डे करण्याचे काम अंतिम पातळीवर असल्याचे सांगण्यात आले.
ही वृक्ष लागवड करण्यासाठी अंदाजित १२ कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही वृक्ष लागवड करताना लिंब, चिंच, बांबू, सागवान, खैर तसेच विविध प्रकारची फळबागांशी निगडीत झाडे लावण्यात येणार आहेत.

Web Title: Targeting 28 lakh trees in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.