कर अधिकारी लाचेच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:44 AM2018-11-21T00:44:31+5:302018-11-21T00:44:49+5:30

शहरातील सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकाऱ्यास १० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.

Tax officer trapped by ACB | कर अधिकारी लाचेच्या जाळ्यात

कर अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकाऱ्यास १० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. प्रदीप सदाशिव देशमुख (३९, रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाने या महिन्यातच ४ अधिका-यांना लाच घेतांना अटक केली आहे.
जालना शहरातील तक्रारदाराने टॅक्स न भरल्याने कर अधिकारी देखमुख यांनी तक्रारदाराचे बँक खाते सील करण्याबाबत बँकेला पत्र दिले. त्यानंतर तक्रारदारांनी टॅक्स भरुन सीए मार्फेत पावत्या कर अधिकारी देशमुख यांना देऊन सील केलेले खाते रिलीज करण्याची विनंती केली. परंतु, देशमुख म्हणाले की, टॅक्स उशिराने भरल्यामुळे तक्रारदारास मोठ्या प्रमाणात दंड करण्याचे अधिकार असल्याचे सांगून १५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत सीएंनी तक्रारदारास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने देशमुख यांना फोन लावून विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदारास प्रत्यक्ष भेटण्यास बोलावले, पैसे दिल्याशिवाय रिलीज करण्याचे पत्र देणार नसल्याचे कर अधिकारी देशमुख यांनी सांगितले. तक्रारदाराने ए.सी. बी. कडे याची तक्रार केली. या तक्रारीवरुन मंगळवारी लाचेची पडताळणी केली असता, त्यांनी लाच स्वीकारल्याचे निषन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकरी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे, पोलीस उपअधीक्षक निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.आ.वि. काशिद, पोनि. चव्हाण, कर्मचारी टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर यांनी केली.

Web Title: Tax officer trapped by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.