जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:25 AM2019-06-05T01:25:56+5:302019-06-05T01:26:03+5:30
२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक पेन्शन कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह १० मे रोजी काढण्यात आलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक पेन्शन कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
जिल्हा जुनी पेन्शन कृती समिती, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा समन्वय समिती, राष्टवादी शिक्षक संघटना, जुक्टा संघटना, जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना या संघटनांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष माणिक दानवे, उध्दव काळे, सचिव प्रा.नंदकिशोर लेखणार, सहसचिव कैलास जाधव, विकास वाघ, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लहाने, डॉ. सुहास सदाव्रते, राष्टवादी शिक्षक संघटनेचे विलास वायाळ, मराठवाडा शिक्षक संघाचे ज्ञानोबा वरवट्टे, जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे शांताराम तौर, जुक्टा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुग्रीव वासरे, अशोक डोरले, समन्वय समितीचे बाबासाहेब बिडवे, अशोक तनपुरे, राजेश नवल, पी. बी. सुरडकर, राजीव काळे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरू, सदानंद निहाळ, प्रेमदास राठोड, हकीम कुरेशी, रमेश आंधळे, मधुकर काकडे आदींची उपस्थिती होती.