शिक्षकांनी केले काळी फित लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:06 AM2019-09-06T01:06:24+5:302019-09-06T01:06:42+5:30
शासन शिक्षकांचे प्रश्न गंभीरतेने घेत नसल्याने शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त काळी फित लावून कामकाज केले.
जालना : शासन शिक्षकांचे प्रश्न गंभीरतेने घेत नसल्याने शिक्षकांनीशिक्षक दिनानिमित्त काळी फित लावून कामकाज केले.
जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व इतर महत्वपूर्ण मागण्यासंदर्भात शिक्षक समन्वय समितीने पुणे येथे बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यस्तरीय आंदोलन करण्याचे ठरवले होते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त काळी फिती लाऊन सरकारचा निषेध केला.
९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात एक दिवशीय लाक्षणिक संप पुकारल्या जाणार आहे. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून शिक्षक कर्मचारी संप पुकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरू, रमेश फटाले, अमोल तोंडे, ए. आय. मोमिन, सोमनाथ बडे, बालाजी माने, लहू राठोड, फेरोज बेग, राजेंद्र लबासे, बी. आर. काळे, सुरेश धानुरे, संदिप पितळे, कैलास गवळी, संतोष वाघमारे, गणेश लादे, शिवाजी आडसूळे, रामेश्वर दहिवाळ, फारूख सय्यद, दत्ता वाघमारे, गोविंद नाईक, मुकेश गाडेकर, नामदेव विर, नामदेव गिते, गिरिधर राजपूत, एस. एस. जाधव आदींचा समावेश आहे.