फेरफार दाखल्यासाठी तहसीलचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:35 AM2018-06-08T00:35:46+5:302018-06-08T00:35:46+5:30
पीककर्जासाठी लागणारा फेरफार दाखल देण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्व:ता अभिलेख कक्षात हजर राहून शेतकऱ्यांना तातडीने फेरफारचा दाखला देण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पीककर्जासाठी लागणारा फेरफार दाखल देण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्व:ता अभिलेख कक्षात हजर राहून शेतकऱ्यांना तातडीने फेरफारचा दाखला देण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात येत आहे.
सध्या शेतक-यांना पीककर्ज घेण्यासाठी बँकानी फेरफार नक्कल आवश्यक आहे. ते मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी नक्कल घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत. काही वेळेस गर्दीमुळे गोंधळ उडत आहेत. शिवाय काही दलालानी नक्कल मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला परिणामी शेतक-यांना वेळेत नकल मिळने अवघड झाले होते. पैसे दिल्याशिवाय कर्मचारी फेरफारची नकलच देत नसल्याने शेतक-यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठिय्या आदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले होते. याबाबत लोकमतने शेतकºयांच्या गैरसोयीबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांच्याकडे सुध्दा शेतक-यांनी तक्रारी केल्या. याची दखल घेत गवळी यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत सूचना केल्या होत्या. यामुळे तहसील प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार कोल्हे यांनी सर्वच कर्मचा-यांना शेतक-यांना फेरफार दाखल देण्याच्या कामाला लावले. स्वत: अभिलेख कार्यालयात हजर राहून शेतक-यांना दाखल्याचे वाटप केले. सध्या फेरफार दाखल्यासाठी तहसील कार्यालयात शेतक-यांची गर्दी होत आहे. शेतक-यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वच कर्मचा-यांना सूचना दिलेल्या आहेत. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.