तात्पुरती नळयोजना नामंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:34 AM2019-05-18T00:34:02+5:302019-05-18T00:34:51+5:30
जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता.
जाफराबाद : जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु, जिल्हाधिका-यांनी सदर प्रस्ताव नामंजूर केल्याचा आरोप नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व पदाधिकाºयांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
जाफराबाद नगर पंचायत पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कोरडीकाठ पडली आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगर पंचायतीने तीन ठिकाणी पूर्णा नदीच्या पात्रात चर खोदले आहे. चर खोदकामासाठी जवळपास ८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यातूनही आवश्यक पाणी मिळत नसून दिवसाकाठी फक्त तीन तास पाणीपुरवठा करता येत आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागत नाही.
नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना देण्यात आला होता. परंतु, जिल्हाधिकाºयांनी सदर नळ योजनेला नामंजूर केले असून, ही योजना मंजूर करण्याचे अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबदल पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे. मात्र न.पकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नसून पाणी वाटप कसे करावे? हा प्रश्न असल्याचे न.प.चे म्हणणे आहे.
जाफराबाद : विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव मांडणार
खडकपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी होऊन मृतसाठा हा कुंभारझरी गावापासून दोन कि.मी. पुढे गेला आहे. या ठिकाणावरून जाफराबाद नगर पंचायतला तात्पुरती नळ योजना सुरु करायची आहे.
मात्र २० लाख रुपयाच्या आत नळ योजना मंजूर करण्याचा अधिकार नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे योजना नामंजूर करण्यात आली आहे.
परंतु न.पने तोच प्रस्ताव रिवाईज केला असून, याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.