समृद्धी महामार्गादरम्यान बुलेट ट्रेनची चाचपणी; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
By संजय देशमुख | Published: October 3, 2022 06:07 PM2022-10-03T18:07:01+5:302022-10-03T18:07:01+5:30
केंद्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गाची पाहणी केली.
जालना: वंदे मातरम् या गतीमान रेल्वे नंतर मुंबई-नागपूर या दरम्यान झालेल्या समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेन नेता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी केंद्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गाची पाहणी केली.
औरंगाबाद आणि जालना येथे रेल्वेची पीटलाईन मंजूर झाली आहे. या कामाच्या भूमिपूजनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज औरंगाबाद आणि जालना दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी औरंगाबाद येथील पीटलाईनच्या कामाचे भूमिपूजन केले. त्यानंतर वैष्णव जालन्याकडे गेले. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. जालन्याच्या पीटलाईनच्या भूमिपूजनादरम्यान त्यांनी येथील समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेनची चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे. तसेच जालन्याच्या रेल्वे स्थानकासाठी दोनशे कोटी रूपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात येइल, असे ही वैष्णव यांनी जाहीर केले.