दोन लाख देऊन लग्न केलेल्या नववधूची पळून जाण्याची तयारी; पुढे आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:45 PM2022-07-07T13:45:12+5:302022-07-07T13:47:55+5:30

धक्कादायक म्हणजे, लग्नातील तरुणीचे आई, मामा हे बनावट होते. तसेच तिला पूर्वीच्या लग्नातून दोन मुली आहेत.

The bride's ready to run away after the wedding; The police investigation came to light fraud of women | दोन लाख देऊन लग्न केलेल्या नववधूची पळून जाण्याची तयारी; पुढे आली धक्कादायक माहिती

दोन लाख देऊन लग्न केलेल्या नववधूची पळून जाण्याची तयारी; पुढे आली धक्कादायक माहिती

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन (जालना):
तालुक्यातील सोयगाव देवी येथील तरुणाला दोन लाख रुपये घेऊन विवाह लावला, दहा दिवस संसार केला व नंतर परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नववधूला भोकरदन पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाह करणारी महिला चक्क दोन मुलींची आई असल्याचा प्रकारही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे.

तालुक्यातील सोयगाव देवी येथील रावसाहेब भाऊसाहेब सहाणे ( 25)  हा तरुण नेवासा येथील एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करीत आहे. नातेवाईकाने रमेश शेळके याच्या मध्यस्थीने रावसाहेबच्या लग्नासाठी एक मुलगी पहिली. रमेशने सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते. तिला २ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक यास तयार झाले. 

त्यानंतर, २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्या सोबत झाला. यावेळी मुलीची आई, मामा, रमेश शेळके, त्याची पत्नी, त्याचा आळंद येथे राहणारा भाऊ, गजू,आशाबाई यांची उपस्थिती होती. लग्नानंतर त्यांना 2 लाख रुपये देण्यात आले. रावसाहेब आणि नातेवाईक त्यानंतर नववधूसह सोयगाव देवी येथे आले. गावातील भाऊबनदांच्या उपस्थितीत पुन्हा 25 जून रोजी देविदास बाबा यांच्या मठावर सोनी वानखडे व रावसाहेब यांचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला. यावेळी गाव जेवण देण्यात आले. 

दरम्यान, सोनी एकदा माहेरी जाऊन आली. परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जात आहे असे सांगितले. ६ जुलै रोजी भोकरदन बसस्टँडवर रावसाहेब सोनीला घेऊन आला. तेव्हा तिथे तिचा प्रियकर होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रावसाहेबने पोलीस स्टेशन गाठले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सोनीने सपोनि रत्नदीप जोगदंड, सपोनि राजाराम तडवी यांनी कसून चौकशी केली असता पैसे घेऊन लग्न करत फसवणूक केल्याची कबुली दिली. रावसाहेब सहाणेच्या तक्रारीवरून सोनी वानखडे हिच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी वानखडे हिला अटक करण्यात आली आहे.

सोनी आहे दोन मुलींची आई 
धक्कादायक म्हणजे, लग्नातील आई, मामा हे बनावट होते. तसेच सोनी वानखेडेचा पूर्वी विवाह झाला आहे. तिला दोन मुली आहेत. तिचे माहेर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव असून पहिल्या पतीला हा प्रकार माहिती नसल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली. 

Web Title: The bride's ready to run away after the wedding; The police investigation came to light fraud of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.