रात्रभर शेतात पिकाला पाणी दिले, सकाळी विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू

By दिपक ढोले  | Published: January 13, 2023 06:21 PM2023-01-13T18:21:54+5:302023-01-13T18:22:42+5:30

विहिरीत पडल्यानंतर डोक्याला मार लागल्याने झाला मृत्यू

The crop was watered in the field overnight, the youth fell into the well and died in the morning | रात्रभर शेतात पिकाला पाणी दिले, सकाळी विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू

रात्रभर शेतात पिकाला पाणी दिले, सकाळी विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू

Next

वाटूर ( जालना) : रात्रभर शेतात पिकाला पाणी दिले, सकाळी विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन एक तरुण ठार झाल्याची घटना परतूर तालुक्यातील वाटूर येथे घडली. अमोल पांडुरंग सातपुते (वय २२) असे मृताचे नाव आहे.

पांडुरंग सातपुते यांची वाटूर येथे शेती आहे. त्यांना दोन मुले आहेत. अमोल हा मोठा मुलगा आहे. त्याने नुकतेच आयटीआयमध्ये शिक्षण पूर्ण केले. अमोलने गुरुवारी रात्री चार वाजेपर्यंत शेतातील पिकांना पाणी दिले. त्यानंतर त्याने झोप घेतली. सकाळी उठून तो शेतातील विहिरीजवळ गेला. तेथे पाणी काढताना त्याचा तोल गेला. विहिरीत पडल्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबियांनी आरडाओरड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर अमोलला बाहेर काढण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, छोटा भाऊ, आजी, आजोबा, काका, काकू असा मोठा परिवार आहे.
 

Web Title: The crop was watered in the field overnight, the youth fell into the well and died in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.