मनोज जरांगे यांचा तन-मन-धनाने संघर्ष; कुटुंब म्हणते, त्यांची काळजी वाटते!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 07:22 AM2023-09-05T07:22:33+5:302023-09-05T07:22:39+5:30

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे आहेत तरी कोण?  

The family of Manoj Jarange, who started an indefinite hunger strike for Maratha reservation, is worried | मनोज जरांगे यांचा तन-मन-धनाने संघर्ष; कुटुंब म्हणते, त्यांची काळजी वाटते!

मनोज जरांगे यांचा तन-मन-धनाने संघर्ष; कुटुंब म्हणते, त्यांची काळजी वाटते!

googlenewsNext

- पवन पवार/अशाेक डाेरले 

सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणाची राज्यासह देशभरातील नेत्यांनी दखल घेतली आहे. इतकेच नाही तर हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांचे प्रतिनिधी या गावात ठाण मांडून आहेत. सर्वत्र एकच विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे आहेत तरी कोण?  

१२ वीपर्यंत शिकलेले मनोज जरांगे यांचे मूळ गाव मातोरी (ता.गेवराई) आहे. आई-वडिल गावाकडे राहत असून, सध्या ते पत्नी, एक मुलगा, तीन मुलींसमवेत समवेत अंकुशनगर येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असली तरी समाजासाठी अहोरात्र काम करण्याची तळमळ त्यांची आहे. गत काही वर्षांपासून ते मराठा आरक्षणासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी दोन एकर जमीन विकलेली आहे.  

भेट घेण्याची इच्छा  
माझे वडील आरक्षणाची लढाई लढत आहेत. गावात जाऊन त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे; परंतु, ते भावनिक होतील. त्यांची खूप काळजी वाटते. शासनाने तत्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. - शिवराज जरांगे, मुलगा

जरांगे यांची पत्नी म्हणते, वाटताे अभिमानही
मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत याचा अभिमान वाटतो. परंतु, आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे त्यांची खूप काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.

Web Title: The family of Manoj Jarange, who started an indefinite hunger strike for Maratha reservation, is worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.