"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:40 AM2023-10-25T11:40:59+5:302023-10-25T11:45:18+5:30

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. पण...

The government is knowingly misleading the Maratha community says Manoj Jarange weapon of hunger strike again on the government | "सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

आजपासून पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत. गेल्या २९ ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झाले. यानंतर, १४ तारखेला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देऊ, मात्र ते कायद्यात टिकायला हवे. यासाठी एक महिन्याची वेळ द्या. असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि आपले उपोषण सोडवले होते. सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच, यापूर्वीही १७ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. मात्र, या आमरण उपोषणात आपण अन्न-पाणी आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता, पण...
मनोज जरांगे म्हणाले, या गोर गरीब लेकरांसाठी आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीने कठोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान ठेऊन आपण त्यांना ३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, आमच्या गोर गरिबांच्या वेदना लक्षात घेऊन कुणाकडूनही अद्याप आरक्षण देण्यात आलेले नाही. आम्हाला कालपर्यंत आशा होती, की सरकार आम्हाला आमच्या हक्काचं, ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे हे उपोषण पुन्हा सुरू केले आहे.

सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे -
मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार -
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६-१७ हून अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या, मात्र संभाजीनगर वगळता, इतरांसाठी मद देण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललेले नाही. आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, असेही जरांगे म्हणाले.

Web Title: The government is knowingly misleading the Maratha community says Manoj Jarange weapon of hunger strike again on the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.