शासनाने डाव टाकणे बंद करावं; उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: February 26, 2024 12:38 PM2024-02-26T12:38:42+5:302024-02-26T12:39:20+5:30
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नये.
जालना : तुम्ही डाव टाकणे बंद करा आणि सगेसोयऱ्याच्या मागे लागा. मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नका. ते तुम्हाला परवडणारे नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषणाबाबत आज सायंकाळी भूमिका जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले.
गावा-गावात साखळी उपोषण, धरणे आंदोलन करा. जाळपोळ-उद्रेक करू नका. अंतरवाली सराटीतही साखळी उपोषण सुरू होणार असून, रोज चौघे उपोषणाला बसणार आहेत. शासनाने आता डाव टाकणे बंद करावे. पोरं जमा करणे, मिडियाद्वारे त्यांच्याकडून बोलून घेणे बंद करा. लोकांचा वापर करू नका. यामुळे तुमचे राजकीय करिअर घडणार नाही. आज सायंकाळी ५ वाजता स्पष्ट भूमिका मांडणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नये. कॅबिनेटमध्ये आज पहिल्या दिवशी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अंतरवाली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घ्या, हैदराबादचे गॅझेट घ्या. कितीही दबाव आणला तरी मी या मागण्यांपासून हटणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.