जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पालकमंत्री अतुल सावेंच्या मध्यस्थीने स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:58 PM2023-11-25T15:58:55+5:302023-11-25T16:01:20+5:30

सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनास उपोषणकर्ते भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले. 

The hunger strike for Dhangar reservation in Jamkhed was called off with the intervention of Guardian Minister Atul Sawan | जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पालकमंत्री अतुल सावेंच्या मध्यस्थीने स्थगित

जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पालकमंत्री अतुल सावेंच्या मध्यस्थीने स्थगित

- अशोक डोरले
अंबड:
तालुक्यातील जामखेड येथे धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणीकरिता सुरू असलेले आमरण उपोषण आज सकाळी बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले.  पालकमंत्री सावे, मंत्री संदिपान भूमरे,आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक आयुष नोपानी,तहसीलदार चंद्रकांत शेळके, स्था.गु शा पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणार्थीची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनास उपोषणकर्ते भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले. 

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी यासाठी दि.५ नोव्हेंबरपासून अंबड तालुक्यातील जामखेड येथे बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र सरकारने आरक्षणाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने  १७ नोव्हेंबरपासून भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गुरुवारी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार, उपविभाग अधिकारी श्रीमंत हरकर,उपविभागीय अधिकारी  दीपक पाटील,तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषण स्थगित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला परंतु, उपोषणकर्ते पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पुढील निर्णय घेण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर शुक्रवारी आमदार गोपचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आ.पडळकर,धनगर आरक्षण अभ्यास समितीचे अॅड.पाचपोळ यांनी आरक्षण प्रक्रियेची माहिती उपोषणार्थीना दिली. 

दरम्यान, आज सकाळी आज सकाळी बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदिपान भूमरे,आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक आयुष नोपानी,तहसीलदार चंद्रकांत शेळके, स्था.गु शा पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणार्थीची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच सरकार धनगर समाजाच्या आरक्षण तसेच इतर विषयावर सकारात्मक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच धनगर समाजाच्या प्रतिनिधी समवेत बैठक घेणार, असे आश्वासन दिले. त्यानंतर गवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी उपोषण स्थगित केले.

उपोषणार्थी भगवान भोजने यांनी धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अभ्यास समितीकडून एक महिन्यात अहवाल घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत सरकारकडून सकारात्मक व तत्परतेने सहकार्य करण्यात यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कारवाई लवकर करावी, समाजासाठी जाहीर योजनांसाठी आर्थिक तरतूद करावी, जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी तात्काळ जागेचे हस्तांतरण स्मारक समिती कडे करण्यात यावे, यासह अन्य विषयावर सरकारकडून लेखी आश्वासन घेत उपोषण स्थगित करण्याचे घोषित केले. यावेळी सरपंच अॅड.रतन तारडे, रामभाऊ लांडे,अॅड.अशोक तारडे, अॅड. मंजित भोजने, डॉ.गंगाधर पांढरे,बळीराम खटके, कपिल दहेकर आदी उपस्थित होते.

Web Title: The hunger strike for Dhangar reservation in Jamkhed was called off with the intervention of Guardian Minister Atul Sawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.