Raosaheb Danve: नादच खुळा... केंद्रीयमंत्र्यांनी चक्क आतंरपाट धरला, कार्यकर्त्यांला सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 04:48 PM2022-07-03T16:48:33+5:302022-07-03T17:11:27+5:30

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क अंतरपाट पकडण्याची भूमिका निभावली. त्यामुळे या विवाह समारंभात उपस्थित असलेले सर्वच वऱ्हाडी मंडळी अवाक झाली होती. 

The sound is open ... The Union Minister Raosaheb Danave held a tight grip, a pleasant shock to the workers | Raosaheb Danve: नादच खुळा... केंद्रीयमंत्र्यांनी चक्क आतंरपाट धरला, कार्यकर्त्यांला सुखद धक्का

Raosaheb Danve: नादच खुळा... केंद्रीयमंत्र्यांनी चक्क आतंरपाट धरला, कार्यकर्त्यांला सुखद धक्का

Next

भोकरदन ( जालना ) - केंद्रीयमंत्रीरावसाहेब दानवे हे नेहमीच आपल्या साधेपणामुळे चर्चेत असतात. मतदारसंघात किंवा आपल्या माणसांत असल्यानंतर त्यांचा हा साधेपणा ठळकपणे दिसून येतो. मग, तो बैलगाडी चालवणं असू, चुलीशेजारी बसून भाकऱ्या खाणं असो किंवा कार्यकर्त्यांसोबत जेवणाच्या पंगती उठवणं असो, त्यांच्यातला कार्यकर्ता दिसून येतो. आता, एका कार्यकर्त्यांच्या मुलीच्या विवाह समारंभात रेल्वे राज्यमंत्रीरावसाहेब दानवे यांनी चक्क अंतरपाट पकडण्याची भूमिका निभावली. त्यामुळे या विवाह समारंभात उपस्थित असलेले सर्वच वऱ्हाडी मंडळी अवाक झाली होती. 

भोकरदन शहरातील एका मंगल कार्यालयात 3 जुले  रोजी दुपारी 12. 45 वाजता तालुक्यातील नळणी येथील गजानन वराडे यांची मुलगी आकांशा व चोरहाळा जगन्नाथ पचारने यांचे चिरंजीव उमेश यांचा  विवाह होता या विवाह साठी दोन्हीकडील वर, वधु पित्यानी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विवाहाचे निमंत्रण दिलेले होते. दानवे हे गेल्या दोन दिवसांपासून भोकरदन तालुक्यात असल्याने त्यांनी 3 जुलै रोजी या विवाह समारंभाला उपस्थित राहिले या वेळी विवाहाची वेळ होऊन गेली होती तरीही विवाह लावला जात नव्हता.

दरम्यान, त्याचवेळी वधू व वराकडील मंडळींनी दानवे यांना व्यासपीठावर बोलावून सत्कार केला व त्यानंतर पुरोहितांनी आंतरपाट पकडण्यासाठी पुकारा केला कोणी लवकर येत नव्हते. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा बडेजाव न करता चक्क आंतरपाट पकडला व पुरोहितांना लवकर विवाह लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी विवाह समारंभात उपस्थित असलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळी यांनी दानवे यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
 

Web Title: The sound is open ... The Union Minister Raosaheb Danave held a tight grip, a pleasant shock to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.