विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले- रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:01 PM2022-08-14T16:01:40+5:302022-08-14T16:09:45+5:30
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
भोकरदन: शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक नेते त्यांच्या निधनावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठा समाजासाठी कायम संघर्ष करणारे माजी आ.विनायक मेटे यांचे झालेले अपघाती निधन मनाला चटका लावणारे ,असून त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया दानवेंनी भोकरदन येथे दिली आहे.
दानवे म्हणाले की विनायक मेटे हे वेगळ्या पक्षात काम करीत असले तरी ते मराठा महासंघाचे काम करीत होते. तेव्हा पासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. ते अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले हे नेतृत्व होते. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले ते नेते होते. विनायक मेटे हे केवळ मराठा समाजाचेच नाही तर सकल समाजाचे ते नेते होते. अति सामान्य कुंटुंबातुन आलेले प्रचंड आत्मविश्वास जिद्द व मेहनतीची पराकाष्ठा म्हणजे विनायक मेटे.
शिवसंग्रामच्या माध्यमातुन त्यांनी उत्तम संघटन व भरीव सामाजिक कार्य त्यांनी केले. सरकार कोणतेही असो त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी अतिशय चांगले संबध होते. त्यातुन ते सामाजिक कामे करत होते. एक उद्धार कर्ता आपण गमावला असून ही पोकळी आता भरून निघने कठीण आहे. असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.