शहागड येथून २३० जनावरांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:37 AM2018-09-10T00:37:47+5:302018-09-10T00:38:17+5:30
अंबड तालुक्यातील शहागड परिसरातून वर्षभरात बैलजोडी, गाई, म्हशी, शेळ्या आदी २३० जनावरांची चोरी झालेली आहे. मात्र अद्यापही एकाही चोरीचा शोध पोलिसांना घेता आलेला नसल्याने शेतकऱ्यात संंताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील शहागड परिसरातून वर्षभरात बैलजोडी, गाई, म्हशी, शेळ्या आदी २३० जनावरांची चोरी झालेली आहे. मात्र अद्यापही एकाही चोरीचा शोध पोलिसांना घेता आलेला नसल्याने शेतकऱ्यात संंताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात परिसरात चो-यांचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी शेतवस्तीवरील आणि घरासमोर बांधलेली शेतक-यांच्या जनावरांना आपले लक्ष केले आहे.
रात्रीचे गोठ्यातील जनावरे चोरुन नेण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. याबाबत वर्षभरात गोंदी पोलिसात विविध तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मात्र याकडे पोलिसांनी गांभिर्याने लक्ष न दिल्याने परिसरातील २३० जनावरांची चोरी झाली आहे.पंधरा दिवसापूर्वी गस्तीवर असताना गोंदी पोलिसांना बैल चोरीतील आरोपी मैनुद्दीन शमशोद्दीन शेख हा कुरण -पाथरवाला बु. रस्त्यावर मध्यरात्री संशयास्पदरीत्या आढळून आला होता. रात्रभर ताब्यात घेऊन त्याला सकाळी सोडून देण्यात आले होते.
त्याच रात्री वाळकेश्वर चे शेतकरी जगदीश मापारी यांच्या कुरण-वाळकेश्वर रस्त्यावरील गोठ्यातून दोन बैल, चार गायी चोरीच्या उद्देशाने सोडून पाथरवाला -कुरण रस्त्यावर कडेला बांधण्यात आले होते. दरम्यान मैनुद्दीन याला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मापारी यांची लाख मोलाची जनावरे चोरीला जाता जाता वाचली होती.