...तर दुकानांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:58 AM2018-02-27T00:58:14+5:302018-02-27T00:58:52+5:30

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा-यांचे दाबे दणाणले आहेत.

... then the shop's license will be cancelled | ...तर दुकानांचे परवाने रद्द होणार

...तर दुकानांचे परवाने रद्द होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा-यांचे दाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील २ हजार ८०० व्यापाºयांनी अन्न औषधी प्रशासन विभागाकडून परवाने काढले आहेत. त्या व्यतिरिक्त १३ हजार ५१५ छोट्या व्यावसायीकांनी नोंदणी केली आहे. गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतांनाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गुटख्यासह सुंगधी तंबाखुची विक्री राजरोसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे पानटपरी धारकच नाही तर अन्न पदार्थ विक्री करणारे मोठे दुकानदारही गुटखा विक्री करीत असल्याचे निर्दशनात आले आहे. जिल्ह्यात अनेक छोटे दुकानदार टप-यामध्ये तंबाखूसोबतच चॉकलेट चिप्स, टॉफी, बिस्कीट, शितपेय आदींची विक्री करतात .अशा ठिकाणी लहान मुलेही चॉकलेट, चिप्स आदीचे सेवन करतात. अशा प्रकारे गुटखाजन्य पदार्थांची विक्री केल्यास लहान मुलावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच अन्न सुरक्षा कायदा २००६ चे कलम ३१ कलमाचे उल्लंघन सर्रासपणे होत आहे. ही बाब शासनाच्या निर्दशनात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी नुकतेच याबाबात आदेश काढून अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार ज्या ठिकाणी अन्न पदार्थाची विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असेल, अशा दुकानदारांवर कडक कारवाई करावी. वेळ पडल्यास संबधीत दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा अन्न सुरक्षा विभागाला दिले आहे. यामुळे ज्या दुकानदाराकडे अन्न सुरक्षा परवाने आहेत, अशा दुकानदारांची आता नियमित तपासणी होणार असून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
राज्यशासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे. मात्र याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने अल्पवयीन तरूण व्यसनाधीन होत आहेत. याकडे मात्र संबधीत विभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: ... then the shop's license will be cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.